top of page
Search
  • Writer's pictureSudarshan Patil

झाड (Zad ) (tree) POEM - Marathi 1

Updated: Oct 21, 2021


झाड

चिंगीनं लावलं एक झाड,

झाडाला म्हणाली, लवकर वाढ.

तुला रोज घालीन पाणी,

तुझ्यासाठी गाईन गाणी.

गाणी ऐकून फुलं फुलतील,

फुलपाखरांचे थवे झुलतील.

फुलतील फुलं छान छान,

हसत राहील पानन्पान.

— ज्ञानदा आसोलकर


1.a) चिंगीने बागेत काय लावलं?

Answer-- चिंगीने बागेचे झाड लावलं.

b) चिंगी झाडाला काय म्हणाली.

Answer - चिंगी झाडाला ‘लवकर वाढ’ म्हणाली.

2. कविता पूर्ण लिहा

चिंगीनं लावलं ___________

____________________

____________________

_____________पानन्पान


3. रिकाम्या जागा भरा.

१). _________________ फुलं छान छान.

२). फुलपाखरांचे थवे ___________________.


4. एका वाक्यात उत्तरे लिहा. Write down answers in one sentence.

१). काय ऐकून फुलं फुलतील?

२). चिंगी झाडाला काय घालणार आहे?

5.- Activity _-- कविता तालासुरात म्हणा


6 समानार्थी शब्द लिहा. Write Synonyms


१). फुल २). पाणी ३). पान


7.. एका शब्दात उत्तरे लिहा. Write answers in one word


१). चिंगी झाडांसाठी काय गाणार आहे?

२). कोण हसत राहील?


8. चूक कि बरोबर ते लिहा.


१). चिंगीने एक झाड लावले.


२). फुलपाखरांचे थवे हसतील.


9. विरुद्धार्थी शब्द लिहा.


१). हसणे २). लवकर ३). फुलणे


10. वचन बदला.


१). झाड २). फूल ३). गाणं ४). थवा ५). पान


90 views0 comments

Recent Posts

See All

Subtraction worksheets and more...

Dear students enjoy activities based on subtraction . Home work ---A) 54778 - 17654 B) 81818-13141 C) 63637 - 8576 subtract vertically. solve and check the score

Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by Margdarshan. Proudly created with Wix.com

bottom of page