top of page
Search
  • Writer's pictureSudarshan Patil

Learn English with Margdarshan

दररोज Margdarshan notes वापरा आणि हे (website) संकेतस्थळ वापरा. हळूहळू आगेकूच करा.

सुरुवात Part of Speech पासून करा. Noun, Pronoun असं करता करता पुढे चला.

जे आज शिकले त्यांची स्वताची एक लहान डायरी बनवा आणि त्यात सूत्रे आणि नवीन शब्द, तुमचे तर्क लिहून ठेवा.. दिवसातून ३-४ वेळा ही डायरी उघडा आणि एक नजर फिरवा.

स्वतःचा एक खाजगी आरसा घ्या. त्यात दररोज स्वतःला पाहून इंग्रजीत बोला. बोलतांना तुमचे व्याकरण, ओठांची हालचाल आणि चेहऱ्याचे हावभाव पहा.

मोबाईल कॅमेरा ॲप्स सगळ्यांचा वापर करा

दैनंदिन जीवनात व्याकरणाचा प्रयोग करा.

Pocket Dictionary विकत घ्या जी शाळेच्या दप्तरात किंवा खिशात सहज येईल. शब्दाचा अर्थ चुकून पण ऑनलाईन पाहू नका. एखादा शब्द अडला, नाही समजला की उशीर न करता तत्काळ त्याचा अर्थ त्यात पहा.

एका आठवड्याला एक निबंध लिहा. एका पानाचा जरी लिहिला तरी चालेल ज्यात तुमचे मत प्रामाणिकपणे लिहा. भारी वाटायला नव्हे, जे जसे जमतेय तसे लिहा.

व्याकरण म्हणजे, “भाषेतील शब्दांच्या व्यवहाराच्या नियमांचे शास्त्र”

FOR SPOKEN ___भाषेचा लहेजा आत्मसात करण्यासाठी ती भाषा वारंवार कानावरून जाण हे अनिवार्य आहे. इंग्लंड मध्ये लहान मूलसुद्धा इंग्रजीत बोलत. ते काय व्याकरणाची पुस्तक वाचून? ऐकून ऐकूनच ना? म्हणून भाषा कानावर पडणे अत्यंत आवश्यक आहे

शालेय जीवनात आणि स्पर्धा परीक्षेसाठी व्याकरणाची आवश्यकता आहे परंतु जर आपल्याला फक्त बोलायला शिकायचं आहे तर ऐकणे ऐकणे ऐकणे तसेच टीव्ही सिरियल्स किंवा इंग्लिश बातम्या पाहणे व इंग्लिश न्युज पेपर किंवा लहान मुलांची पुस्तके वाचणे अत्यावश्यक आहे

सुरवातीला जेव्हा तुमच्याशी कोणी इंग्रजीत संवाद साधायचा प्रयत्न करेल तेव्हा तुम्ही कचराल. डोक्यात वाक्यरचना कराल आणि धीर एकवटून एखाद वाक्य बोललं. तुम्हाला अचानक वाक्य सुचेल पण एखाद्या बरोबर शब्दासाठी अडाल. अशावेळी घरी जाऊन चाऊसची मराठी TO इंग्लिश DICTIONARY खूप कामाला येईल.

आपण इंग्रजी ही एक भाषा असून तो शाळेतील किंवा कॉलेजमधील विषय नाही आहे हे मानायला हवे..

जशी आपली मातृभाषा मराठी आहे त्याचप्रकारे इंग्रजी पण ही एक सोपी भाषा आहे तो जगातील कोणताही व्यक्ती सहजरित्या शिकू शकतो. खूप लोक असे असतात त्यांना लिहिता वाचता येत पण बोलताना आत्मविश्वास कमी असतो त्याच कारण आहे की आपल्याला इंग्रजी मध्ये बोलण्याकरिता तस वातावरण आपल्या सभोवती मिळत नाही. यावर उपाय व टिप्स पुढच्या लेखात देऊ सध्या इंग्रजीमधील काळ हा भाग पाहू

TENSES -

सदरील लेखांमध्ये क्रियापदांच्या रूपांना V1, V2 , V3 ,V4 असे संक्षिप्त रूप दिलेले आहे तसेच S म्हणजे सब्जेक्ट O म्हणजे ऑब्जेक्ट

Simple Present Tense – साधा वर्तमानकाळ (सामान्य वर्तमान)

‘नेहमीची घडणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमानकाळ वापरला जातो.’

रचना – कर्ता + क्रियापदाचे पहिले रूप + कर्म

S+ V1(s or es)+ O

उदाहरण 1 – He writes a letter उदाहरण 2 – They go to school.

उदाहरण 3 -Ramesh goes to school. (रमेश स्कूल जाता है.)


____ या काळात कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला s किंवा es प्रत्यय लावतात. कर्ता अनेकवचनी असेल तर क्रियापदाला s किंवा es प्रत्यय लावला जात नाही. मात्र I आणि YOU च्या पुढे वापरल्या जाणाऱ्या क्रियापदाला s किंवा es प्रत्यय लागत नाही

Present Continuous Tense – चालू वर्तमानकाळ ((अपूर्ण वर्तमान)

‘एखादी क्रिया वर्तमानात चालू आहे किंवा सुरु आहे हे दर्शवण्यासाठी चालू वर्तमानकाळ वापरतात’

रचना – कर्ता + am/is/are + क्रियापदाचे पहिले रूप + ing + कर्म

क्रियापदाचे पहिले रूप + ing= V4 असे समजावे

S+is/am/are +V4+O

उदाहरण 1 – He is going to School.

उदाहरण 2 – They are going to school.

उदाहरण 3 – Ramesh is going to school. (रमेश स्कूल जा रहा है)

सहाय्यकारी क्रियापदे कशी आणि कुठ वापरणार ?

How do you use helping verbs .

Is – कर्ता एकवचनी असताना – उदा. He, she, Ram,Sham

am – कर्ता I असताना

are – कर्ता अनेकवचनी असताना – उदा. They, We,The students..etc

Present Perfect Tense –पूर्ण वर्तमानकाळ (पूर्ण वर्तमान)

वर्तमानकाळात एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे असे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात

रचना – कर्ता + have/has + क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म

S+have/has+V3+O

उदाहरण 1 – He has gone to School. उदाहरण 2 – They have gone to school.

सहाय्यकारी क्रियापदे कशी आणि कुठ वापरणार ?

has – कर्ता एकवचनी असताना – उदा. He, she, Radha, Sachin

have– कर्ता अनेकवचनी किंवा I असताना – उदा. They, We, I

Present Perfect Continuous Tense चालू पूर्ण वर्तमान (सतत् पूर्ण वर्तमान)

खूप पूर्वीपासून सुरु असलेली एखादी क्रिया अजूनही सुरु असेल किंवा नुकतीच संपली आहे. असे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू वर्तमानकाळ वापरतात.

रचना – कर्ता + have/has + been + क्रियापदाला ing + कर्म

S + have/has + V4 + O

उदाहरण 1 – He has been going to School.

उदाहरण 2 – They have been going to school.

सहाय्यकारी क्रियापदे कशी आणि कुठ वापरणार ?

has – कर्ता एकवचनी असताना – उदा. He, she, Radha, Sachin

have– कर्ता अनेकवचनी किंवा I असताना – उदा. They, We, I

Past Tense – भूतकाळ

Simple Past Tense – साधा भूतकाळ

‘भूतकाळात ठराविक वेळी एखादी क्रिया झाली किंवा घडून गेली असे सांगण्यासाठी आपण साधा भूतकाळ वापरतो’

रचना – कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप + कर्म

S + V2+ O

उदाहरण 1 – He went to School. उदाहरण 2 – They went to school.

महत्वाचा मुद्दा – या काळात नेहमी क्रियापदाचे दुसरे रूप यते.

Past Continuous Tense – चालू भूतकाळ

‘एखादी क्रिया भूतकाळात चालू होती किंवा सुरु सुरु होती हे दर्शवण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात’

रचना – कर्ता + was/were + क्रियापदाचे पहिले रूप + ing + कर्म

S+was/were+V4+O

उदाहरण 1 – He was going to School.

उदाहरण 2 – They were going to school.

सहाय्यकारी क्रियापदे कशी आणि कुठ वापरणार ?

Was – कर्ता एकवचनी असताना – उदा. He, she, Radha, Sachin

Were – कर्ता अनेकवचनी असताना – उदा. They, We

Past Perfect Tense –पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया ठराविक वेळेपर्यंत सुरु होती हे सांगण्यासाठी आपण पूर्ण भूतकाळ वापरतो.

रचना – कर्ता + had + क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म

S + had +V3 +O

उदाहरण 1 – He had gone to School. उदाहरण 2 – They had gone to school.

Past Perfect Continuous Tense –पूर्ण चालू भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया ठराविक वेळेआधी सुरु होते आणि त्या वेळेपर्यंत सुद्धा सुरु होती असे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू भूतकाळ वापरतो.

रचना – कर्ता + had + been + क्रियापदाला ing + कर्म

S+ had + been + V4+ O

उदाहरण 1 – He had been going to School.

उदाहरण 2 – They had been going to school.

Present Tense – भविष्यकाळ

Simple Future Tense – साधा भविष्यकाळ

भविष्यात एखादी क्रिया होईल असे दर्शवण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात’

रचना – कर्ता + shall किंवा will + क्रियापदाचे पहिले रूप + कर्म

S + will +V1 +O

उदाहरण 1 – He will go to School. उदाहरण 2 – They will go to school.

महत्वाचे – जुन्या नियमांनुसार I आणि We कर्ता असेल तर यानंतर shall चा वापर करत आणि इतर सर्व कर्त्यांनंतर will या क्रियापदाचा वापर करत. परंतु सध्या नव्या पद्धतीनुसार सरसकट सर्व ठिकाणी will या क्रियापदाचा वापर केला जातो.

Future Continuous Tense – चालू भविष्यकाळ

‘एखादी क्रिया भविष्यात चालू असेल किंवा किंवा सुरु असेल हे दर्शवण्यासाठी चालू भविष्यकाळ वापरतात’

रचना – कर्ता + shall/will + be + क्रियापदाचे पहिले रूप + ing + कर्म

S+ shall/will + be +V1+O

उदाहरण 1 – He will be is going to School.

उदाहरण 2 – They will be going to school.

Future Perfect Tense –पूर्ण भविष्यकाळ

भविष्यकाळातील एखादी क्रिया ठराविक वेळेआधी पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी पूर्ण भविष्यकाळ वापरतात.

रचना – कर्ता + will have + क्रियापदाचे तिसरे रूप + कर्म

S+ shall/will have + V3+ O


उदाहरण 1 – He will have gone to School.

उदाहरण 2 – They will have gone to school.

Future Perfect Continuous Tense –पूर्ण चालूभविष्यकाळ

भविष्यकाळात एखादी क्रिया ठराविक वेळेत सुरु होऊन त्या वेळेतही पूर्ण झाली नसेल आणि सुरूच असेल असे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू भविष्यकाळ वापरतात

रचना – कर्ता + will/shall have + been + क्रियापदाला ing + कर्म

S + will/shall have + been + V4 + O

उदाहरण 1 – He will have been going to School.

उदाहरण 2 – They will have been going to school.

140 views0 comments

Recent Posts

See All

Subtraction worksheets and more...

Dear students enjoy activities based on subtraction . Home work ---A) 54778 - 17654 B) 81818-13141 C) 63637 - 8576 subtract vertically. solve and check the score

Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by Margdarshan. Proudly created with Wix.com

bottom of page