top of page
Search

स्थान-विस्तार std10

  • Writer: Sudarshan Patil
    Sudarshan Patil
  • Jun 22, 2021
  • 7 min read

स्थान विस्तार

हा पाठ नकाशाच्या दृष्टीने तसेच एकेक गुणांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा पाठ आहे. या पाठातील प्रत्येक ओळ न ओळ महत्त्वाची असल्यामुळे सर्व पाठ नजरेखालून गेलाच पाहिजे. निरीक्षण, वर्गीकरण, फरक, तुलना, आलेख आकृत्या आणि नकाशांचे वाचन, मूल्यमापन, विश्लेषण, निष्कर्ष, सादरीकरण आणि चिकित्सक विचारह्या क्षमतांचा विकास होण्यासाठी आपण ह्या वर्षी भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत.

स्थान-विस्तार सांगण्याच्या दोन पद्धती आहेत.

१. संदर्भीय स्थान -संदर्भीय स्थानामध्ये कुठला तरी एखादा संदर्भ द्यावा लागतो. उदा. मंदिर, रस्ता, दिशा किंवा एखादं मोठं ठिकाण इत्यादी.

२. अक्षवृत्त व रेखावृत्तीय विस्तार सांगून -आपण अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगून एखादे अचूक ठिकाण सांगू शकतो.

भारताचे स्थान : • भारताचे स्थान उत्तर गोलार्धात

• आशिया खंडात दक्षिण भागात

• भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते.

• कर्कवृत्त जाणारे राज्ये- गुजरात,राजस्थान,मध्यप्रदेश,छत्तीसगड,झारखंड,पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मिझोराम

• अक्षवृत्तीय विस्तार- ८º४’२८’’ उत्तर ते ३७º६’५३’’ उत्तर

• एकूण अक्षवृत्तीय विस्तार- २९º२’२५’’

• रेखावृत्तीय विस्तार- ६८º७’३३’’ पूर्व ते ९७º२४’४७’’ पूर्व

• एकूण रेखावृत्तीय विस्तार- २९º१७’१४’’

• भारताचा अक्षवृत्तीय विस्तार मोठा असल्यामुळे विस्ताराचा प्रभाव पर्जन्यमान,तापमान आणि दिवसरात्रीच्या कालावधीवर पडतो.

• भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून पूर्वेला बंगालचा उपसागर आहे.

• दक्षिणेला हिंदी महासागर आहे.

• भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान मानारचे आखात आणि पाल्कची सामुद्रधुनी आहे.

• अरबी समुद्र,हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे कन्याकुमारी येथे एकत्र येतात.

भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले. आहे. भारताच्या मुख्य भूमीचे स्थान हे 80.40 ते 370.60 उत्तर अक्षांश आणि 680.70 ते 970.250 पूर्व रेखांशामध्ये विस्तारले आहे. अंदमान आणि निकोबार या बेटांनी पुढे दक्षिणेकडे भारताचा रेखांशीय विस्तार वाढविला आहे. ग्रेट निकोबार बेटातील ‘इंदिरा पाँईंट’ हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. तर जम्मू व काश्मीर मधील ‘इंदिरा कोल’ हे भारतातील उत्तरेकडील टोक आहे.

भारताच्या मध्यातून 23 1/20 उत्तर अक्षांश गेले आहे. ते कर्कवृत्त या नावाने ओळखले जाते. तर 82 1/20 पूर्व रेखांश देशाच्या मध्यातून गेलेले आहे. हे भारताचे मध्य रेखांश असून ते अलाहाबाद शहराजवळून गेलेले आहे. त्यावरूनच भारताची प्रमाणवेळ (आयएसटी) निश्चित करण्यात आलेली आहे.

भारताचा विस्तार :

रशिया, कॅनडा, चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यासाररख्या देशानंतर भारत हे जगातील सातवे मोठे राष्ट्र आहे. भारताचे एकूण क्षेत्रफळ 32, 87, 263 चौ.कि.मी इतके आहे. जगाच्या एकूण भूभागापैकी 2.42 % भाग भारताने व्यापलेला आहे. भारताची पूर्वपश्चिम रूंदी 2,933 कि.मी आणि उत्तर - दक्षिण लांबी 3,214 कि.मी, इतकी आहे.

भारताच्या सीमा :भारताला भूसीमा व जलसीमा दोन्ही लाभल्या आहेत. देशाच्या भूसीमेची लांबी 15,200 कि.मी. आहे. उत्तरेकडे असलेला हिमालय पर्वत ही भारत आणि चीन यांच्यातील नैसर्गिक सीमा आहे. भारताच्या प्रमुख भूप्रदेशाला 6100 कि.मी. लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. (अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटांचा किनारा धरून ती लांबी 7516.5 कि.मी. इतकी होते.) भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे.

शेजारील राष्ट्रे :भारताच्या शेजारी एकूण 7 राष्ट्रे आहेत. भारताच्या वायव्येला पाकिस्तान आणि अफगणिस्तान, उत्तरेला नेपाळ, भूतान आणि चीन. तसेच पूर्वेकडे बांग्लादेश आणि म्यानमार (पूर्वीचा ब्रह्मदेश) हे देश आहेत. भारताच्या आग्नेयेला श्रीलंका देश असून तो पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात यामुळे भारताच्या प्रमुख भूभागापासून वेगळा झाला आहे.

राजकीय विभाग : भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशाच्या राज्यकारभाराच्या सोयीच्या ट्टष्टीने भारतात भाषावार प्रांतरचनेनुसार जी राज्ये अस्तित्वात आलेली आहेत. त्यांची संख्या सध्या 29 आहे. आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताची राजधानी दिल्ली असून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून विशेष दर्जा आहे. अलीकडे आंध्रप्रदेशमधील काही भाग वेगळा करून ‘तेलंगाणा’ हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले आहे. सध्यातरी त्या राज्याची तसेच आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबाद ही आहे. या सर्व राज्यांचा विस्ताराच्या दृष्टीने विचार केला तर सर्व राज्यांमध्ये राजस्थान हे विस्ताराने सर्वात मोठे राज्य आहे तर गोवा हे सर्वात छोटे राज्य आहे.

भारत आणि इतर राष्ट्रांमध्ये ज्या सीमा आहेत. त्याही वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात. त्यांची नावे विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा रॅडक्लिफरेषा म्हणून ओळखण्यात येते.भारत आणि आफगाणिस्तानमधील सीमारेषा ड्युरांड रेषा म्हणून ओळखली जाते. तर भारत व चीनमधील सीमारेषा मॅकमोहनरेषा म्हणून ओळखतात. अद्याप नवीन ब्ल्यू प्रिंट आलेली नसली तरी नकाशा कसा काढावा

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी : सुमारे दीड शतक भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत तीन युद्धांना सामोरे जाणे, अनेक भागांतील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. भारतही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते.

ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी : ब्राझील हा देश तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझीलला १८२२ साली स्वातंत्र्य मिळाले. १९३० पासून १९८५ पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे.

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे. ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीन व भारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते. ब्राझील देशाचे नाव 'पाऊ ब्रासील 'या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे

अक्षांश ५.१५o उ. ते ३३o.४५ द.अक्षवृत्त ५.१५o हे रोराईमा ला लागून जाते, तर ३३o.४५ द हे रिओ ग्रान्दे दो सुलला लागून जाते .

रेखांश विस्तार- 34o 45' प. हे रेखावृत्त परायबा आणि पैर्नामब्युको अलंगवासला लागून जाते . 73o 48'प. हे रेखावृत्त आक्रेला लागून जाते. महत्त्वपूर्ण घटना

- स्वातंत्र्य दिवस (पोर्तुगालपासून)

सप्टेंबर ७, १८२२ (घोषित)

ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता)

- प्रजासत्ताक दिन नोव्हेंबर १५, १८८९

क्षेत्रफळ

- एकूण ८५,१४,८७७ किमी२ (५वा क्रमांक)

- पाणी (%) ०.६४

लोकसंख्या

- २००९ १९,२२,७२,८९०[१] (५वा क्रमांक)

Use this worksheet after reading

Source -Wikipedia and others

for educational purpose & fair use

Recent Posts

See All

Comments

Post: Blog2_Post

Subscribe Form

Thanks for submitting!

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2020 by Margdarshan. Proudly created with Wix.com

bottom of page